|
मेनू...
- उपाहार
- गोडधोड
|
 ही पाककॄती इंग्रजीमध्ये इथे वाचा.
लाल भोपळ्याची बाकर भाजी
प्रमाण: ४ माणसांसाठी
साहित्य:
- १ १/२ पाऊंड लाल भोपळा (साधारण पाऊण किलो)
- १/४ कप सुकं खोबरं ,
- १ टेबलस्पून तीळ,
- २ टेबलस्पून खसखस,
- २ टेबलस्पून चारोळी,(ऐच्छीक)
- २ लसणीच्या पाकळ्या,(ऐच्छीक)
- १ चमचा काळा मसाला,
- २ चमचे लाल तिखट,
- १ चमचा हळद,
- १ चमचा मोहरी,
- १/२ चमचा मेथीचे दाणे,
- १ चमचा गूळ,
- १/२ चमचा चिंचेचा कोळ,
- १/४ चमचा हिंग,
- मीठ चविनुसार,
- ३ टेबलस्पून तेल,
- ओलं खोबरं-कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती:
- प्रथम एका कढईत तीळ सोनेरी रंग येईपर्यंत भाजावेत.
- तीळ वेगळे काढून त्याच कढईत सुकं खोबरं, चारोळी आणि खसखस एकत्र तांबुस रंगावर कोरडंच भाजून घ्यावं.
- वरील सर्व जिन्नस आणि लसूण बारीक वाटून घ्यावं.
- भोपळ्याची साल काढून भोपळा धुऊन घ्यावा व त्याचे चौकोनी तुकडे करावेत.
- कढईत तेल तापवून त्यात मोहरी, मग मेथीचे दाणे घालावेत. हिंग, हळद घालावी. भोपळ्याच्या फोडी घालून नीट ढवळून घ्यावे. १ कप पाणी घालावे व झाकण ठेवून शिजत ठेवावे.
- भोपळ्याच्या फोडी शिजत आल्या की त्यात वाटलेला मसाला, काळा मसाला, चिंच, गूळ, तिखट, मीठ घालावे आणि ढवळून भाजी दोन मिनिटे शिजू द्यावी.
- वरून खोबरं कोथिंबीर पेरून पोळी किंवा भाताबरोबर वाढावी.
|
|