मेनू...
उपाहार
पोळी-भाजी-आमटी इत्यादी..
गोडधोड
Garam Masala
ही पाककॄती इंग्रजीमध्ये इथे वाचा.
गरम मसाला - प्रकार १

प्रमाण: साधारण १/३ कप

साहित्य:

 • २ टेबलस्पून धणे ,
 • २ चमचे जिरे,
 • १ १/२ टेबलस्पून अख्खे मिरीदाणे,
 • साधारण २० लवंगा
 • १ दालचिनीचा तुकडा १ १/२ इंच,
 • ३ टेबलस्पून बडिशेप


कृती:

 1. प्रथम एका स्वच्छ कोरड्या कढईत लवंग, दालचिनी, बडिशेप आणि मिरे मंद आंचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजावे व बाजुला काढावे. जास्त लाल होऊ देऊ नये.
 2. त्याच कढईत धणे किंचित तांबुस होईस्तोवर भाजावेत मग त्यात जिरे घालून गॆस बंद करावा.
 3. या सर्व मसाल्यांची बारीक पूड करावी. आणि गार झाल्यावर घटट झाकणाच्या बाटलीत मसाला भरून ठेवावा.
 4. या मसाल्यात बडिशेप असल्याने कुठल्याही भाजीला एक छान स्वाद येतो. हा मसाला वापरून मिश्र भाज्यांचा कुर्मा छानच होतो.

टीपा:

 1. वर दिलेल्या प्रमाणात साधारण १/३ कप मसाला होतो. जास्त प्रमाणात करताना त्यातल्या सर्व मसाल्यांचे प्रमाण सारख्याच प्रमाणात वाढवू नये. उदाहरणार्थ, लवंगा जरा जपूनच घालाव्यात. नाहीतर मसाला खूप उग्र/जळजळीत होऊ शकतो.